Breaking News

कफ खोकला घरगुती उपाय मुतखडा घरगुती उपाय Bobby Deol
आज होणार मराठा आरक्षणाबाबत मोठा निर्णय|मुंबईत आज होणार बैठक 

25 Aug-आज  मराठा आरक्षणाची चर्चा करण्यासाठी बैठक बोलवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीराजे भोसले, मराठा क्रांती मोर्चा पदाधिकाऱ्यांना या बैठकीसाठी निमंत्रीत करण्यात आले आहे. या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

Sharad Pawar :शरद पवारांचा गौप्यस्फोट म्हणाले|मी जबाबदारी घेणार नाही

मराठा आरक्षणाबाबत मुंबईत आज संध्याकाळी महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. यापूर्वी 14 ऑगस्ट 2022 रोजी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे या बैठकीसाठी मुंबईत येत असताना त्यांचे अपघाती निधन झाले. मेटेंच्या मृत्यू नंतर ही बैठक रद्द करण्यात आली होती. आज पुन्हा या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

CM एकनाथ शिंदेंनी विरोधकांना डिवचले|कमी बॉल्समध्ये जास्त रन्स काढायचे

मिळालेल्या माहितीनुसार, 12 संघटना आणि 50 मराठा समन्वयकांना बैठकीचं निमंत्रण देण्यात आले आहे. मराठा मंत्रीमंडळ उपसमितीचं अध्यक्षपद चंद्रकांत पाटील यांच्यावर सोपवण्याचा मोठा निर्णय या बैठकीत घेतला जाण्याची शक्यता आहे. या आधी अशोक चव्हाणांकडे हे अध्यक्षपद होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे.

चंद्रपुर जिल्हयात ७० फूट खाली जमिनीत गाडलं गेलं घर ;कोणतीही जीवितहानि नाही;पहा Video

OBC पाठोपाठ मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नव्या शिंदे-फडणवीस सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी संघर्ष सुरू आहे. सुरूवातील नारायण राणे यांच्या नेतृत्वात हा लढा उभारला गेला. त्यानंतर भाजप सरकारच्या काळात मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं.

काँग्रेस चे यूट्यूब चॅनल झाले’डिलीट’|पक्षात उडाली खळबळ

मात्र हे आरक्षण कोर्टात टिकलं नाही. त्यानंतर सुप्रीम कोर्टातला संघर्ष सुरू झाला. मात्र गेले अनेक वर्षे प्रयत्न करूनही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत सरकारला अपयश आलं आहे. मात्र आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली निघताना दिसत असताना मराठा समजालाही आरक्षण मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

शिंदे सरकारला सुप्रीम कोर्टाचा दणका|पालिकेत 4 प्रभागाच्या निर्णयाला स्थगिती 

Leave a Reply

Your email address will not be published.

Share Article: