Breaking News

कफ खोकला घरगुती उपाय मुतखडा घरगुती उपाय Bobby Deol
खोकला उपाय
The Best Natural Cough Remedies,Some natural remedies may help to relieve a cough.

मनापासुन स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की खोकल्यावर आपण काय घरगुती उपाय करू शकतो. पाहिले तर खोकला सर्दी फक्त हिवाळ्यात किंवा थंडीच्या दिवसात येत होता परंतु आता वर्षभर व्हायरल इन्फेक्शन वाढत आहे की कोणतेही आजाराची आता ऋतू राहिलेला नाहीये. कोणताही आजार आपल्याला कधीही उद्भवू शकतो. व्हायरल इन्फेक्शनमुळे आपल्याला सर्दी खोकला ताप हे वारंवार होत असते तर सर्दी आणि ताप आपली गोळी घेतल्यानंतर लगेच होते परंतु जो खोकला आहे तो आपला लगेच बरा होत नाही तर हा खोकला आपल्याला कधी कधी महिनाभर दोन महिने तीन महिने देखील आपली पाठ सोडत नाही तर अशा वेळी किती औषध घ्यावे हा देखील आपल्याला प्रश्न पडतो तर औषध न घेता आपण या खोकल्या वरती घरगुती उपाय केला तर तो आपल्याला जास्त असरदार होईल मेडिकल औषधांचा काही तरी साईड-इफेक्ट आपल्या शरीरावर होऊ शकतो परंतु जर आपण घरातील घरगुती औषधांचा वापर केला तर त्याचा आपल्या शरीरावर कोणताही साईड इफेक्ट होणार नाही.

खोकला दूर करण्यासाठी आपण कोण कोणते घरगुती उपाय करू शकतो ,खोकला घरगुती उपाय मराठी

१.मध,अडूळसा आणि आले

एक चमचा मध घ्यायचा आहे आणि एक चमचा अडळूसा आणि त्यामध्ये अर्धा चमचा आल्याचा रस टाकायचा आहे आणि हे आपण पदार्थ घेतलेला आहे ते मिक्स करायचा आहे एकत्र करायचे आहे आणि आपल्याला हे औषध प्यायचं आहे. त्याच्यामुळे  खोकला बरा होण्यासाठी मदत होते.

खोकला उपाय
Sardi cough home remedies in Marathi

15+ Best Skin Care Pimple Removal |Pimpal Janyasathi Upay |चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठी घरगुती उपाय

२.लवंग आणि मध

खोकला आल्यावर नुसती लवंग खाण्यापेक्षा लवंग आणि मध हे मिश्रण एकत्र करा आणि त्याचं चाटण घ्या. हा उपाय करण्यासाठी लवंग चांगल्या भाजून घ्या.  अवघ्या ५- ६ सेकंदात लवंग चांगल्या भाजल्या जातात. त्यानंतर या लवंगा हातानेच थोड्या जाड्याभरड्या चुरून घ्या. त्यात थोडा मध टाका आणि हे चाटन चाऊन चाऊन खा.

खोकला उपाय
Sardi cough home remedies in Marathi

20 Best Solution on All Hair Problems|केसांच्या समस्या आणि घरगुती उपचार

 ३. आलं

 आलं तर तुम्हाला माहितीये की आलं हे खोकल्यावरती खूपच चांगला उपाय आहे. नुसताच आल्याचा वापर केला तरीसुद्धा चालू शकतो. काहीना आल्याने देखील चांगला लगेच खोकल्यावरती असर जाणवतो खोकला बरा होतो. तर तुम्ही नुसता आल्याचा तुकडा तोंडात ठेवला तरी सुद्धा काही दुखत असेल तर त्याच्यावरती चांगला परिणाम जाणवतो डोकं दुखणे ,खोकला बरा होतो

खोकला उपाय
Sardi cough home remedies in Marathi

10+ Powerful Home Remedies for Oily Skin|तेलकट त्वचेची अशी घ्या काळजी |वापरा घरगुती facepack

४.मीठ आणि आलं

 परंतु जास्त प्रभावी उपाय करण्यासाठी काय करायचं मीठ आणि आलं मिकस करायचा आहे आणि त्याची तुम्ही म्हणू शकता रिमिक्स केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे.आल्याचा छोटा तुकडा बारीक कुटून घ्या आणि त्यामध्ये चिमूटभर मीठ मिक्स करा. हे मिश्रण आता आपल्या दाढेखाली ठेवा आणि त्याचा रस हळूहळू घशामध्ये उतरू द्या किंवा जो रस निघेल तो गिळत राहा. पाच मिनिटांनंतर आले बाहेर फेका 

खोकला उपाय
Sardi cough home remedies in Marathi

Glowing Skin Secrets|चेहरा सुंदर आणि गोरा दिसण्यासाठी घरगुती उपाय facepack

५.पिंपळाची गाठ

कोरड्या खोकल्याचा त्रास होत असेल तर, पिंपळाची गाठी उपयोगी येईल. पिंपळाची गाठ बारीक करून त्यात 1 चमचा मध घालून नियमित घ्यावी. यामुळे कोरड्या खोकल्यात आराम मिळेल.

६.निलगिरी तेल

खोकला बरा करायचा असेल तर, नारळाच्या तेलात नीलगिरीच्या तेलाचे काही थेंब मिसळा आणि छातीवर मॉलिश करा. गरम पाण्यात नीलगिरीच्या तेलाचे थेंब घालून वाफही घेता येते. यामुळे श्वासोच्छ्वास घेण्याच त्रास होणार नाही.

20+Best Dry Skin Home Remedies|घरीच बनवा कोरड्या त्वचेला सुंदर आणि तजेलदार या घरगुती उपायांनी|

​७.मिठाच्या पाण्याच्या गुळण्या

 एका मोठ्या ग्लासमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यामध्ये एक चमचा मीठ मिक्स करा. या पाण्याने गुळण्या करा. दिवसातून दोन वेळा हा उपाय करावा. खोकला आणि घशातील खवखव कमी करण्यासाठी हा रामबाण उपाय आहे. मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्यानं श्वसन नलिकेतील संसर्ग दूर होण्यास मदत मिळते. शिवाय खोकल्यामुळे घशामध्ये होणाऱ्या वेदनाही कमी होतात. मीठ अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांनी परिपूर्ण असतं जे घशातील व तोंडातील बॅक्टेरिया मारण्यास व ओरल हेल्थ जपण्यास मदत करतं.

खोकला उपाय
Sardi cough home remedies in Marathi

८.पुदिना आणि तुळस

या दोन्ही गोष्टी खोकला घालविण्यासाठी उपयुक्त आहेत. यासाठी १० ते १५ पुदिन्याची पानं घ्या. त्यामध्ये तेवढीच तुळशीची पानं टाका. एक ग्लासभर पाण्यात पाने चांगली उकळू द्या. पाणी उकळून अर्धा ग्लास झालं की त्यात गुळाचा मध्यम आकाराचा खडा टाका आणि हा काढा गरम गरम पिऊन घ्या. रोज रात्री काही दिवस हा काढा नियमित घेतला तर नक्कीच खोकला बरा होईल. 

खोकला उपाय
Sardi cough home remedies in Marathi

९.हळदीचे दूध

 हळदीचे दूध प्यायल्याने केवळ खोकलाच नाही तर कित्येक आजारांपासून तुमची सुटका होण्यास मदत मिळते. एक ग्लास दुधामध्ये अर्धा चमचा हळद मिक्स करून नियमित प्या. कोरड्या खोकल्याची समस्या अगदी काही दिवसांत कमी होईल.या घटकामुळे सर्दी, खोकला आणि श्वसनाशी संबंधित कित्येक आजारांचा त्रास कमी होतो.

खोकला उपाय
Sardi cough home remedies in Marathi

१०.गरम पाण्याची वाफ

 सर्दी खोकल्यामुळे कधी कधी आपल्याला श्वास घेणे सुद्धा कठीण होते. अशावेळी गरम पाण्याची वाफ घ्यावी. गरम पाण्याच्या वाफेमुळे कफ बाहेर पडतो. श्वासोच्छवास करताना होणाऱ्या अडचणी दूर होतात. तसंच चेहऱ्यावरील रोम छिद्रांमध्ये जमा झालेली धूळ, माती आणि दुर्गंध देखील बाहेर फेकली जाते. पण आठवड्यातून दोन वेळाच हा उपाय करावा. अन्यथा चेहऱ्याच्या त्वचेवर दुष्परिणाम होऊ शकतात.

खोकला उपाय
Sardi cough home remedies in Marathi

११.अडुळसा

 अडुळशाच्या पानांचा काढा कोरडया खोकल्यासाठी फार उपयुक्त आहे. काढा तयार करून दिवसातून ३-४ वेळा घ्यावा.

खोकला उपाय
Sardi cough home remedies in Marathi

१२.पेपरमिंट

घश्यातली जळजळ आणि वेदना दूर करण्यात पेपमिन्टची मदत होऊ शकते. यासाठी दिवसातून 2 ते 3 वेळा पेपरमिन्टचा चहा प्या.

 १३.मध

खूप जुन्या काळापासून मधाचा वापर खोकला घालविण्यासाठी केला जातो. घशातलं इन्फेक्शन दूर करण्यासाठी मध उपयुक्त ठरतो. हा उपाय करण्यासाठी अर्धा ग्लास गरम पाणी घ्या. यामध्ये दोन टेबल स्पून मध टाका आणि सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्या. काही दिवस हा उपाय नियमितपणे केल्यास नक्कीच खोकला जातो.

खोकला उपाय
Sardi cough home remedies in Marathi

१४.गूळ

सर्दी आणि खोकल्यावर गूळ खाणे हा प्रभावी उपाय आहे. गुळातील पोषक घटकांमुळे जमा झालेला कफ बाहेर पडण्यास मदत मिळते. सर्दी खोकल्याव्यतिरिक्त गुळामुळे पचनाशी संबंधित समस्या देखील कमी होतात. कोमट पाण्यामध्ये गूळ पावडर मिक्स करा आणि प्या.

खोकला उपाय
Sardi cough home remedies in Marathi

१५ . गिलोय आणि तुळशी

गिलोय, तुळशीचा काढा बनवून सकाळी व संध्याकाळी प्या. याने फक्त कोरडा खोकलाच नाही तर, तीव्र खोकला देखील नाहीसा होतो.

१६.डाळिंबाची साले

डाळिंबाची साले उन्हात ठेवा आणि वाळवा. याचा प्रत्येक तुकडा तोंडात ठेवून चघळत राहा. कोरड्या खोकल्यातून यामुळे मोठा आराम मिळतो.

 १७.ज्येष्ठमधाचा चहा

 ज्येष्ठमधाचा चहा प्यायल्यानंतर कोरडा खोकला कमी होतो. हा चहा तयार करण्यासाठी कपभर पाण्यामध्ये दोन मोठे चमचे ज्येष्ठमधाची पावडर उकळत ठेवा. १० ते १५ मिनिटे पाणी उकळू द्या. यानंतर कपामध्ये चहा गाळून घ्या. तुम्हाला हवे असल्यास चहामध्ये मध मिक्स करू शकता. दिवसातून दोन वेळा हा चहा तुम्ही पिऊ शकता.

खोकला उपाय
Sardi cough home remedies in Marathi

१८.सुंठ-साखर

  सुंठीची पूड साखरेत एकत्र करून रात्री झोपण्यापूर्वी घ्यावी.चहा- कृष्ण तुळशीची १५-२० पाने, ५-६ लवंगा, ५-६ मिरीचे दाणे, एक इंच लांब सुंठ एक जुडी गवती चहा, सुपारीच्या अर्ध्या खांडाएवढा गुळाचा एक खडा. हे सर्व नीट बिनदुधाच्या कोऱ्या चहात घालून रात्री प्यावे.

१९.ज्येष्ठमध

मधाप्रमाणेच ज्येष्ठमध देखील खोकल्यावरचा प्रभावी उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्ही जेष्ठमधाची काडी नियमितपणे चोखू शकता. किंवा मध आणि ज्येष्ठमध यांचं चाटण घेऊ शकता. हे चाटण तयार करण्यासाठी एक टेबलस्पून मध घ्या. त्यामध्ये २ टीस्पून ज्येष्ठमधाची पावडर टाका. हे चाटण गिळून घ्या. 

२०.मध आणि काळी मिरी

 मध आणि ४ ते ५ काळ्या मिऱ्यांची पावडर असं मिश्रण एकत्र करूनही त्याचं चाटण घ्यावं. ते देखील खोकल्यासाठी उपयुक्त ठरतं.

कोमट पाणी – रात्री झोपताना कोमट पाण्याने भरलेला ग्लास जवळ ठेवा. खोकल्याची उबळ आल्यास त्यातले दोन घोट पाणी प्या. यामुळे शोष कमी होतो आणि उबळ थांबते.

खोकला उपाय
Sardi cough home remedies in Marathi

२१.अळशीच्या बिया

सर्दी आणि खोकल्यावर अळशीच्या बिया हा फारच प्रभावी उपाय आहे. यासाठी अळशीच्या थोड्या बिया पाण्यात उकळून घ्या. हे पाणी आटेपर्यंत उकळून घ्या. मग थंड करून हे पाणी लिंबाचा रस आणि मध घालून प्या. यामुळे तुमच्या सर्दी-खोकल्यावर लगेच परिणाम होईल

२२.गाजराचा रस

गाजराचा रस हा फक्त डोळ्यांसाठीच नाहीतर सर्दी खोकल्यावरही गुणकारी आहे. तुम्ही यासाठी कच्चं गाजरही खाऊ शकता किंवा गाजराचा रसही पिऊ शकता.

२३.तूप आणि मिरपूड

शुद्ध तूपात मिरपूड पावडर मिक्स करुन त्याचे चाटण तयार करा. कोरड्या खोकल्याच्या समस्येतून आराम मिळेल.

२४.तुळस ,आलं आणि मध

तुळशीची पाने आणि आल्याचा रस मधात मिसळून दिवसातून 4 ते 5 वेळा सेवन करा. यामुळे दिलासा मिळेल.

२५.मध आणि आलं

एक चमचा मधात एक चमचा आले रस मिसळून चाटण बनवा, याने कोरड्या खोकल्यापासून आराम मिळतो.

२६.सैधव मिठाचे पाणी

सकाळी व संध्याकाळी पाण्यात सैंधव मीठ घालून पाणी त्या कोमट पाण्याने गुळण्या करा. यामुळे देखील भरपूर आराम मिळेल. यामुळे घाश्यातील जळजळ आणि संक्रमण देखील निघून जाईल.

 २७.जीरे 

जिऱ्यामध्ये व्हिटॅमिन आणि अॅन्टिऑक्सिडेंट असतात. जे बॅक्टेरिया, जंतू नष्ट करतात. सर्दी-खोकल्यावर जीरं खाण्याने फायदा होतो. खोकल्यावर कच्चं जिरं किंवा जिऱ्याचं पाणी पिणं फायदेशीर ठरतं.

२८.बडीशेप आणि खडीसाखर

 बडीशेप आणि खडीसाखर हे मिक्स करून ठेवल्यास आणि ते वारंवार घेत राहिले तरी यामुळे  खोकला बरा होण्यासाठी मदत होते बडीशेप सोबत तुम्ही खडीसाखरेचा जर वापर केला तर तुम्हाला खोकल्यावर  आराम करणार आहे

खोकला उपाय
Sardi cough home remedies in Marathi

२९.मध आणि आलं

 एक चमचा मधात एक चमचा आले रस मिसळून चाटण बनवा, याने कोरड्या खोकल्यापासून आराम मिळतो.

30. गरम पाणी आणि मध

कोमट पाण्यात मध मिसळून प्यायल्याने घशाला आराम मिळतो. खोकला झाल्यास रोज मध खावा किंवा रात्री झोपण्यापूर्वी मध मिश्रित कोमट पाणी प्यावे यामुळे कोरडा खोकला बरा होतो

लक्षात ठेवा

जर, खोकला सामान्य कारणांमुळे झाला असेल, तर सुरुवातीच्या काळात हे घरगुती उपचार केल्यास आराम मिळू शकेल. परंतु यासह, खाण्यापिण्याचे पथ्य पाळणे फार महत्वाचे आहे, अन्यथा या उपचारांचा काही उपयोग होणार नाही. सामान्यत: 8-10 दिवसांच्या आत घरगुती उपचार केल्यामुळे सामान्य खोकला बरा होतो, परंतु त्यानंतरही आराम मिळाला नाही तर, हे गंभीर समस्येचे लक्षण देखील असू शकते. या प्रकरणात, तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

(टीप : कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)  

(Annoyed by constant dry cough know the causes and home remedies for this cough)

Leave a Reply

Your email address will not be published.

Share Article: