Breaking News

कफ खोकला घरगुती उपाय मुतखडा घरगुती उपाय Bobby Deol
नऊवारी नेसून आजीबाईंनी फोडली दहीहंडी! पाहा महिलांची भन्नाट दहीहंडी, व्हायरल व्हिडिओ 

महिलांनी दहीहंडी फोडल्याचे आपण अनेक ठिकाणी बघितलेही आहे. पण या व्हिडिओतली दहीहंडी आणि ती फोडणाऱ्या आजीबाई मात्र नेटकरींना भन्नाट आवडल्या आहेत. 

कृष्ण जन्म सोहळा आणि त्यानंतरचा दहीहंडी आणि गोपाळ काल्याचा कार्यक्रम म्हणजे जणू उत्साहाला आलेले उधाण असते. आता फक्त मुंबईतच नाही, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दहीहंडी उत्सव साजरा केला जातो.

Twin Tower: ट्वीन टॉवर पापणी लवण्याआधी झाली भुईसपाट

एकावर एक मानवी मनोरे रचून फोडण्यात येणाऱ्या दहीहंडीचे दृश्य बघणे हा खरोखरंच अतिशय रोमांचकारी क्षण आहे. आता गोविंदांच्या बरोबरीने महिलांचे दहीहंडी पथकही पुढे येत आहेत. महिलांनी दहीहंडी फोडल्याचे आपण अनेक ठिकाणी बघितलेही आहे. पण या व्हिडिओतली दहीहंडी आणि ती फोडणाऱ्या आजीबाई मात्र नेटकरींना भन्नाट आवडल्या आहेत. 

भंडाऱ्यात मालकावर संतापला बैल;बैलपोळयाला शिंगावर घेऊन आपटलं जमिनीवर, घटनेचा Video Viral

या व्हिडिओचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या मानवी मनोऱ्यामध्ये सहभागी झालेल्या महिलांची वेशभुषा. यासाठी त्यांनी कोणतेही बडेजाव करणारे कपडे घातलेले नाहीत.

अगदी रोजच्या कपड्यांत म्हणजेच सहावारी, नऊवारी साडी नेसून महिला यात सहभागी झाल्या आहेत. सगळ्यात वर चढताना आजीबाईंना बरीच मेहनत घ्यावी लागली.

चंद्रपुर जिल्हयात ७० फूट खाली जमिनीत गाडलं गेलं घर ;कोणतीही जीवितहानि नाही;पहा Video

उभे राहिल्यानंतर आणि दहीहंडी पकडताना अनेकदा त्यांचा तोल जातो की काय, असेही बघणाऱ्याला वाटते. पण त्यांनी मात्र मोठ्या कौशल्याने आणि अगदी ऐटीत एक- दोन झटक्यातच दहीहंडी फोडली आणि मग इतर सगळ्या महिलांनी एकच आनंदोत्सव साजरा केला. 

दीड कोटीचे घर आले महामार्गाच्या मध्ये|शेतकऱ्याने केली अजब युक्ती|नेटकरी मनाले ओ शेट तुमी नादच केला थेट!

मुंबई विमानतळावरून पाच कोटीचे कोकेन जप्त

Leave a Reply

Your email address will not be published.

Share Article: