2022 मध्ये बॉलीवूड चित्रपटांनी फारशी कमाई केली नाही, बिग बजेट चित्रपटांनी चांगली कमाई केली नाही. पण आता 2023 च्या पहिल्या महिन्यात बड्या स्टार्सचे चित्रपट येत आहेत.
विशाल भारद्वाज यांच्या मुलाने दिग्दर्शित केलेला ‘कुत्ते ‘ हा चित्रपट १३ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तब्बू, कुमुद मिश्रा, कोंकणा सेनशर्मा, नसीरुद्दीन शाह, राधिका मदन आणि अर्जुन कपूर यांच्या भूमिका आहेत. हा सिनेमा अॅक्शन थ्रिलर असणार आहे.
अंशुमन झा आणि मिलिंद सोमण यांचा ‘लक्कडबग्गा’ हा चित्रपट कुत्तेसोबत प्रदर्शित होणार आहे.
हा चित्रपट कोलकाता येथील एका सत्य घटनेवर आधारित आहे. 28व्या कोलकाता फिल्म फेस्टिव्हलमध्ये तो प्रदर्शित झाला होता.
‘शेरशहा’नंतर आता सिद्धार्थ मल्होत्रा नव्या भूमिकेत दिसणार आहे. ‘मिशन मजनू’ या चित्रपटात तो रश्मिका मंदानासोबत दिसणार आहे.
हा चित्रपट 20 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट एका भारतीय गुप्तहेरावर आधारित आहे.
शाहरुख खानचा बहुचर्चित ‘पठाण’ हा चित्रपट 25 जानेवारीला रिलीज होणार आहे. शाहरुख खान 3 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.
या चित्रपटात शाहरुख खानशिवाय दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम दिसणार आहेत.
या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्याने चांगलाच वाद निर्माण केला होता. आता सेन्सॉर बोर्डाने बदल करण्याचे आदेश दिले आहेत. फोटो सौजन्य: इंडियन एक्सप्रेस