Breaking News

कफ खोकला घरगुती उपाय मुतखडा घरगुती उपाय Bobby Deol

Benefits of Onion

Benefits of Eating Raw Onion, Kanda Khanyache Fayade ,कांदा खाण्याचे फायदे,कांद्याचे फायदे

नमस्कार मित्रानो, कांदा हा किचनमधील एक आवश्यक पदार्थ आहे.चिरताना कांदा आपल्याला रडवतो पण त्याच्यामुळेच भाजीला चव येते.पण तुम्हाला माहिती आहे का आपल्या आरोग्यासाठी कांदा वरदान आहे.आज आपण कांद्याचे फायदे पाहणार आहोत. चरक व सुश्रुताच्या मते, कांदा शक्तिदायक, शरीर सुदृढ बनविणारा व बुद्धिवर्धक समजला जातो.

वाग्भट कांदयाला कफज व वातज समजतात. तसेच मूळव्याधीत व शेक करण्यासाठी तो हितावह असतो.कांदा वात, पित्त आणि कफ या तीनही विकारांवर गुणकारी आहे. कांदयाच्या
सेवनाने वातप्रकोप शांत होतो, पित्त बाहेर निघून गेल्याने कमी होते आणि कफ नाहीसाहोतो. तथापि कांदयाने किंचित कफ होत असल्याने कित्येक वैदय कफ विकारात कांदा निषिद्ध मानतात.

हेही वाचा : 10+ Powerful Home Remedies for Oily Skin|तेलकट त्वचेची अशी घ्या काळजी |वापरा घरगुती facepack

वास्तविक पाहता वृद्धांना व लहान बालकांच्या मातांना कफ प्रकोपवर कांदा देणे अत्यंत गुणकारी आहे. कांदयाच्या सेवनाने आतड्यांची कार्यशक्ती वाढते व शौचशुद्धी होते. त्यामुळे मूळव्याध, अपचन, कॉलरा, गुद्भ्रंश आणि कावीळ या व्याधींमध्ये कांदा दिला जातो. कांदा उष्ण असूनही जेवल्यानंतर आंतरिक शांतता देतो.कांदा थोडा रेचक असल्याने पोटात किंवा आतड्यात एकत्र झालेला मळ बाहेर काढून टाकतो.

Table of Contents

१.सुदृढ शरीरासाठी कांद्याचे फायदे

जो रोज सकाळी तुपाबरोबर कांदा सेवन करेल त्याचे स्नायू व शरीर सुदृढ होऊनमनुष्य सात दिवसांत व्याधीमुक्त होईल.उडदाची चाळीस तोळे डाळ घेऊन ती कांदयाच्या रसात भिजवावी व मग उन्हातसुकवावी. वीस दिवसपर्यंत लागोपाठ उडदाची डाळ कांदयाच्या रसात भिजवावी व मगउन्हात सुकवावी. नंतर या डाळीचे पीठ बनवून काचेच्या बरणीत भरावे. सकाळी त्यातीलदोन तोळे पीठ घेऊन दुधात घालून प्यावे. रोजच्या आहारात दुधा-तुपाचे सेवन चालू
ठेवावे, गरम मसाला वर्ज्य करावा. चार-पाच आठवडे हा प्रयोग केल्याने शरीर चांगले सुदृढ बनते.

२. फुफ्फुसे सुदृढ होण्यासाठी कांद्याचे फायदे

पावशेर कांदा पावशेर तुपात भाजून एकवीस दिवस खाल्ल्याने क्षय रोगाची खराब
झालेली फुफ्फुसे सुदृढ बनतात व फुफ्फुसातील जंतू नष्ट होऊन फुफ्फुसातील कीड
नष्ट होते.



३.पुरुषत्व मिळवण्यासाठी कांद्याचे फायदे

पांढऱ्या कांदयाचा रस, मध, आल्याचा रस आणि तूप प्रत्येकी दहा ग्रम घेऊन ते
सर्व जिन्नस एकत्र करून एकवीस दिवस रोज सकाळी प्यायल्याने पुरुषत्व प्राप्त होते.

हेही वाचा :Glowing Skin Secrets|चेहरा सुंदर आणि गोरा दिसण्यासाठी घरगुती उपाय facepack

४.पायाला पेटके येण्याचे किंवा पाय दुखण्याचे थांबते

अर्धा तोळा कांदयाचा रस, पाच तोळे गाईचे तूप, अर्धा तोळा मध आणि अर्धा
तोळा आल्याचा रस एकत्र करून प्यायल्याने सौंदर्य, शक्ती व उत्साह वाढतो तसेच रात्री
थकवा येऊन पायाला पेटके येण्याचे किंवा पाय दुखण्याचे थांबते.

हेही वाचा ::शेवग्याचे फायदे जाणून व्हाल आश्चर्यचकित; शेवग्याचे ३६ घरगुती उपाय

५. वीर्यवृद्धीसाठी कांद्याचे फायदे

सहा मासे कांदयाचा रस, तीन मासे तूप आणि तीन मासे मध एकत्र करून रोज
सकाळ-संध्याकाळी घेऊन त्यावर साखर घातलेले गरम दूध प्यायल्याने वीर्यवृद्धी होते.
हा प्रयोग एक दोन महिने करावा. त्यामुळे उरःक्षतमध्ये (छातीवर झालेल्या जखमेत)
फायदा होतो.
कांदयाचा रस आणि मध एक-एक तोळा एकत्र करून त्याचे एकवीस दिवसपर्यंत
सकाळी चाटण करावे. त्यामुळे वीर्यवृद्धी होते.

हेही वाचा ::कफ खोकला घरगुती उपाय, खोकल्यावर 30 घरगुती उपाय


६. जीर्णज्वरात कांद्याचे फायदे

कांदा शिजवून खाल्ल्याने जीर्णज्वरात फायदा होतो.

७.कफ दूर होतो

कांदयाचे तुकडे करून ते पाण्यात घालून उकळून प्यायल्याने कफ दूर होतो.


८. झोप चांगली येते.

पांढरा कांदा बारीक वाटून, त्यात साखर आणि दही घालून खाल्ल्याने अम्लपित्त
व गळ्यातील दाह दूर होतो. दही घालून रात्री कांदयाची कोशिंबीर खाल्ल्याने झोप
चांगली येते.

हेही वाचा :झोप येण्यासाठी करा हे 12 घरगुती आयुर्वेदिक उपाय


९.तोंड स्वच्छ होते

कांदा खाल्ल्याने गळ्यात व तोंडात चिकटपणा रहात नाही. तोंड स्वच्छ होते. दात
दुधासारखे शुभ्र रहातात,

स्मरणशक्ती वाढते व दुर्बल झालेले स्नायू मजबूत बनतात.
जिरे आणि सैंधव घालून जेवताना कांदयाची कोशिंबीर खाल्ल्याने गळा स्वच्छ
राहतो, गळ्यात साचलेला कफ दूर होतो आणि पोटातील विषारी घटक नष्ट होतात.

हेही वाचा :20+Best Dry Skin Home Remedies|घरीच बनवा कोरड्या त्वचेला सुंदर आणि तजेलदार या घरगुती उपायांनी|

१०. अशक्तपणा घालवण्यासाठी कांद्याचे फायदे

तुपात भाजलेला कांदा शिऱ्याबरोबर खाल्ल्याने आजारपणाने आलेला अशक्तपणा
दूर होऊन शरीरात लवकर शक्ती येते.


११.आतडी मजबूत होतात

कांदा गरम राखेत दाबून ठेवून, तो रोज सकाळी खाल्ल्याने आतडी मजबूत होतात,
शौचशुद्धी होते व शक्ती वाढते.


१२.अजीर्णाचा विकार

कांदयाचा रस व कारल्याचा रस एकत्र करून प्यायल्याने जुनाट अजीर्णाचा विकार
दूर होतो.


१३. अपचनसाठी कांद्याचे फायदे

एक तोळा कांदयाचा रस, अर्धा तोळा आल्याचा रस व एक रतीभार हिंग घेऊन
त्यात थोडे मीठ व पाणी घालून प्यायल्याने अपचन दूर होते. आवश्यकता भासल्यास
हे मिश्रण दोन तासांनी पुन्हा दयावे.


१४.पोट फुगणे

पोट फुगले असता कांदयाच्या रसात भाजलेला हिंग व मीठ घालून पाजल्याने
फायदा होतो.

१५.कावीळसाठी कांद्याचे फायदे

पांढरा कांदा, गूळ आणि हळद एकत्र करून सकाळ-संध्याकाळ खाल्ल्याने
कावीळ बरी होते.

१६.प्लीहा

एक मोठा कांदा ओल्या फडक्यात गुंडाळून कोळशाच्या निखाऱ्यावर भाजून
दयावा. एक रात्र तो तसाच ठेवावा. सकाळी अनशा पोटी दोन-दोन रती नवसागर व हळद
घालून खाल्ल्याने वाढलेली प्लीहा बरी होते.

१७.उंची वाढते.

कांदा आणि गूळ मुलांना रोज खायला घातल्याने त्यांची उंची वाढते.

१८.लहान मुलांना चांगली झोप येते.

एक लिटर पाणी उकळवून खाली उतरावे. त्यात पाच तोळे कांदयाचा कीस घालून
पाच-दहा मिनिटे तसेच ठेवून दयावे. थंड झाल्यावर गाळून त्यातून एक चमचा पाणी
दयावे व त्यात पाच थेंब मध घालून लहान मुलांना प्यायला दिल्याने चांगली झोप येते.

१९.कृमीसाठी कांद्याचे फायदे

एक चमचा कांदयाचा रस दिल्याने अन्न घेणाऱ्या लहान मुलांना झालेले लहान
कृमी मरून जातात व पुन्हा होत नाहीत. तसेच अपचनही दूर होते.

२०.आचकी येणे

पांढरा कांदा दाबून लहान मुलांना हुंगवल्याने लहान मुलांच्या आचकी येणे-
हातपाय ताणले जाणे या विकारात फायदा होतो.

२१.जुलाबामध्ये कांद्याचे फायदे

कांदा पाट्यावर बारीक वाटून दोन-चार वेळा पाण्याने धुऊन त्यात दही घालून
दिवसातून तीन वेळा खाऊ घातल्याने रक्ताचे जुलाब बंद होतात.

२२.उलट्या

कांदयाचा दोन-दोन तोळे रस एक-एक तासाने त्यात थोडे पाणी घालून प्यायल्याने
अपचनाने होणाऱ्या उलट्यामध्ये व जुलाबांत फायदा होतो

२३.कॉलरासाठी कांद्याचे फायदे

कॉलऱ्याची साथ सुरू असते तेव्हा रात्री भोजनानंतर कांदयाच्या रसात, हरभऱ्याच्या
डाळीएवढा हिंग उगाळून त्यात एक मासे बडीशेप व धन्याची पूड मिसळून प्यायल्याने
कॉलऱ्याचा उपद्रव होत नाही.
कॉलरा झाला असता रोग्याला कांदयाचा रस वरचेवर दिल्याने आराम मिळतो.
कॉलरा झाल्याबरोबर दर तासाने कांदयाच्या रसात रतीभर हिंग घालून प्यायला दिल्याने
कॉलरा लवकर बरा होतो.
कॉलऱ्यामध्ये शरीर थंड पडले असेल तर कांदयाच्या रसात आल्याचा रस व
मिरीपूड घालून पाजल्याने शरीरात सत्वर उष्णता उत्पन्न होते व वेदनांची तीव्रता कमी
होते.

हेही वाचा :15+ Best Skin Care Pimple Removal |Pimpal Janyasathi Upay |चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठी घरगुती उपाय

२४.मूळव्याधसाठी कांद्याचे फायदे

एक तोळा कांदयाच्या रसात अर्धा तोळा साखर आणि पाव तोळे तूप घालून
प्यायल्याने व रोज रात्री पोट साफ ठेवण्यासाठी इसबगूल घेतल्याने मूळव्याध बरे होते.
कांदयाचे लहान लहान तुकडे करून ते उन्हात सुकवावे. त्यातील एक तोळे तुकडे
तुपात तळावेत. त्यात एक मासे काळे तीळ व दोन तोळे दळलेली साखर घालून रोजकांदा बारीक चिरून दहयात घालावा. त्यात चवीप्रमाणे मीठ घालून रोज सकाळी
खाऊ घातल्याने मूळव्याधमधून स्रवणारे रक्त बंद होते व शौचशुद्धी होऊन रक्तीमूळव्याध
बरे होते.

हेही वाचा :20+Best Dry Skin Home Remedies|घरीच बनवा कोरड्या त्वचेला सुंदर आणि तजेलदार या घरगुती उपायांनी|

२५.उन्हाळीसाठी कांद्याचे फायदे

कांदा, जिरे व साखर वाटून खाल्ल्याने उन्हाळणे बरे होते. कैरी भाजून त्याचा गर
व कांदा वाटून तो दयावा म्हणजेही उन्हाळणे (उन्हाची झळ लागून होणारा त्रास) बरे
होते.

२६.मासिक स्त्राव .

कांदा चिरून कच्चा खाल्ल्याने स्त्रियांचा मासिक स्त्राव साफ येतो व त्यांना होणारा
त्रास बंद होतो.

हेही वाचा :मासिक पाळी एका तासात येण्यासाठी १२ घरगुती असरदार उपाय

२७. नाकातून पडणारे रक्त

कांदा ठेवून त्याचा रस हुँगायला दिल्याने अगर नाकात कांदयाच्या रसाचे थेंब
टाकल्याने नाकातून पडणारे रक्त बंद होते.

२८.बेशुद्धी

कांदा कापून बेशुद्ध झालेल्या मनुष्याला लगेच हुंगवला, तर तो लगेच शुद्धीवर
येतो. हिस्टेरियामुळे जेव्हा फीट येते तेव्हाही कापलेला कांदा हुंगायला दिल्याने आश्चर्यकारक
फायदा झालेला दिसून येतो. नाकात कांदयाच्या रसाचे थेंब टाकल्याने वात, हिस्टेरिया,
बेशुद्धी तसेच सर्दी दूर होते.

२९.डोकेदुखी

उन्हाने डोके दुखत असल्यास कांदा कापून हुंगवल्याने किंवा बारीक वाटून
तळपायांना घासल्याने डोकेदुखी बंद होते.

३०.त्वचारोग

कांदयाच्या रस नायटा गजकर्ण यासारख्या त्वचारोगावर किंवा त्वचेला खाज सुटते
तेव्हा चोळल्यास फायदा होतो.

३१.डोक्यातील उवा

कांदयाच्या रसात मोहरीचे तेल घालून चोळल्याने संधिवाताचे दुखणे बरे होते.
कांदयाचा रस डोक्याला चोळल्यास डोक्यातील उवा मरतात.

३२.गळवे

वाफवलेल्या कांदयात मीठ घालून त्याचे पोटीस कच्च्या गळबावर बांधल्याने गळू
लवकर पिकून जखम लवकर भरून येते.
कांदा कापून तुपात किंवा तेलात भाजून त्यात हळद घालून पोटीस बनवावे. हे
पोटीस गळवावर बांधल्याने गळवे लवकर पिकते. जखमेवर हे पोटीस बांधल्याने
जखमेच्या वेदना कमी होतात.

३३.गाठीवर

कांदयावर ओले फडके गुंडाळून, कांदा कोळशाच्या निखाऱ्यावर ठेवावा. तो
शिजला की बाहेर काढून चांगला बारीक करून त्यात थोडी हळद घालून हे पोटीस
बगलेतील गाठीवर (मांजऱ्या) बांधावे म्हणजे गाठ जिरून जाईल किंवा गाठ लवकर
पिकून फुटेल.

३४.नारू

थोडा कांदा, लसूण, थोडा साबण, एक बिब्बा आणि दहा मासे बनारसी मोहरी
घेऊन सर्व मिश्रण बारीक वाटावे व त्याच्या लहान लहान गोळ्या बनवाव्या. ही गोळी
बावीस तास नारूवर बांधावी. हा प्रयोग तीन दिवस केल्याने नारू बाहेर येतो.

३५.डोळ्यांचे विकार

कांदयाचा रस डोळ्यात घातल्याने डोळे दुखण्याचे बरे होतात. कांदयाच्या रसात
थोडे मीठ घालून त्याचे थेंब डोळ्यात घातल्याने रातांधळेपण बरे होते. उन्माद रोगात
पांढऱ्या कांदयाच्या रसाचे अंजन केले जाते.
कांदयाच्या रसात साखर घालून त्याचे थेंब डोळ्यात घातल्याने डोळ्यातील उष्णता
दूर होते. तसेच डोळे दुखत असताना डोळ्यात घातल्यास फायदा होतो.
कांदयाचा अर्धा शेर रस काढून त्यात एक फडके भिजवून ते सावलीत सुकवावे.
त्या फडक्याची वात करून तिळाच्या तेलात भिजवून लावावी. त्याचे काजळ पाडून
डोळ्यात घातल्याने डोळ्यात पडलेले फूल बरे होते.

३६.कानाचे विकार

पांढऱ्या कांदयाच्या रसाचे थेंब कानात घातल्याने बहिरेपणा दूर होतो. कांदयाचा
रस व मधाचे थेंब कानात घातल्यानेही कानात दुखायचे बंद होते आणि पू निघण्याचेही
बंद होते.


३७.दातदुखी

एका वाटीत चिरलेला कांदा तेलात घालून ती वाटी गॅसवर ठेवावी. त्यावर छिद्र
असणारे भांडे झाकावे. त्या छिद्रावर पोकळ नळी बसवून त्याची वाफ घेतल्याने दातातील
कीड मरून जाते आणि दातदुखीही बरी होते. कांदयाचे बी चिलमीत भरून धुम्रपान
केल्यानेही दातदुखी बरी होते.


३८.विष उतरते

कुत्रा चावल्याने झालेल्या जखमेवर कांदयाच्या रसात मध घालून लावल्याने जखम
लवकर भरून येते व विषही उतरते.
माकड चावले असेल, तर कांदा व मीठ वाटून लावल्याने आराम वाटतो.
कांदा व लसूण वाटून लावल्याने गोमेचे विष उतरते.
कांदयाच्या रसात नवसागर घालून ते विचवाच्या दंशस्थानी लावल्याने विंचू उतरतो.
कांदयाचा रस भुंग्याच्या दंशावर लावल्यास आराम वाटतो.

३९.केसांचे सर्व विकार

दर आठवड्याला कांद्याच्या रसाने उपचार करणे हा कोंडा टाळण्यासाठी, आणि केसगळतीवर उपचार करण्याचा एक नैसर्गिक मार्ग आहे. कांद्यामध्ये आढळणारे सल्फर आणि जीवनसत्त्वे केसांच्या वाढीस उत्तेजन देतात आणि टाळूच्या आरोग्यास प्रोत्साहन देतात. पिवळा कांदा वापरण्यासाठी सर्वोत्तम प्रकार आहे कारण त्यामध्ये अधिक व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह आणि प्रथिने असतात, परंतु पांढरे किंवा लाल कांदे देखील कार्य करतात. 

रस काढण्यासाठी तुम्हाला ज्युसर किंवा ब्लेंडरची आवश्यकता असेल आणि नंतर काढलेल्या रसाला आपल्याला केसांना आणि स्काल्पला लावायचा आहे.एक तास ठेवून केस नॉर्मल पाण्याने धूवून टाकायची आहे.हा उपाय तुम्ही आठवड्यातून एकदा करू शकता.

हेही वाचा :केस गळणे कारणे, केसांची घ्यायची काळजी आणि केस गळण्यावर ९ घरगुती उपाय

#महत्वाची टीप –  घरगुती उपाय हे आपल्या माहितीसाठी आहे हे करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा .

Leave a Reply

Your email address will not be published.

Share Article: