Breaking News

कफ खोकला घरगुती उपाय मुतखडा घरगुती उपाय Bobby Deol

Moringa :Health Benefits of Drumstick Powder

how to make moringa powder at home ,how to use moringa powder moringa, moringa benefits,
moringa for weight loss, moringa leaves, Moringa powder ,moringa powder benefits,
moringa powder benefits in Marathi ,moringa powder uses, moringa tea,
Superfood moringa


नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत शेवग्याचे फायदे .शेवग्याला superfood देखील म्हणतात एवढे त्याचे महत्व आहे.शेवग्याला शास्त्रीय नाव MORINGA असे आहे.

शेवग्याचा उपयोग 300 रोगावर केला जातो.शेवग्याचे पान हे अत्यंत उपयोगाचे असून त्यात लोह, फॉस्फरस, प्रोटीन, कॅल्शियम, potashiyam,
magneshiyam, व्हिटामिन ए बी सी आणि डी मोठ्या प्रमाणावर असतात.त्यामुळे खत शुद्धी, रक्तदाब, सर्दी, खोकला, पोटदुखी मासिक पाळी,, पुरुषांमध्ये शुक्राणूंची कमतरता चेहयावरील पिंपल, रिंकल, काळे रोग, मेंदूची power वाढवणे तसेच कॅन्सर आणि पोटदुखी
अशा अनेक रोगांवर गुणकारी आहे.

हेही वाचा : 15+ Best Skin Care Pimple Removal |Pimpal Janyasathi Upay |चेहऱ्यावरील पिंपल्स जाण्यासाठी घरगुती उपाय

शेवगा तिखट, तीक्ष्ण, गरम, मधुर, हलका, अग्निप्रदीपक, रुची करणारा, रुक्ष, खारट, कडूसर, दाहकारक, जुलाबात गुणकारी, वीर्यवर्धक, हृदय
पित्त व रक्तप्रकोपक तसेच डोळ्यांना हितावह आहे. तो कफ, वायू, आतील गळू, सूज,कृमी, मेद, गळ्याची गाठ, विष, प्लीहा, गोळा, गंडमाळ व व्रण दूर करू शकतो.पांढरा शेवगाही उपर्युक्त गुण असणारा आहे. विशेषतः तो दाहकारक आणिप्लीहा, गळू, व्रण, पित्त व रक्तदोष दूर करत असतो. शेवग्याची फुले तिखट, गरम,तीक्ष्ण, रक्तप्रसारक व ग्राही असतात. स्नायूंवरील सूज, कृमी, कफ, वायू, गळू, प्लीहा
व गोळाउठणे हे विकार दूर करतात. वातविकार असणाऱ्यांसाठी शेवग्याची भाजी अत्यंत हितावह आहे.

Table of Contents

शेवग्याचे उपयोग

१.चेहयावरील पिंपल

चेहऱ्यावरती जर पिंपल्स आले असतील तर तुमी facepack मध्ये शेवगा पावडरचा /moringa powder वापर करू शकता.moringa powder मध्ये honey मिसळून तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता.यामुळे तुमचे पिंपल्स जावून तुमचा चेहरा glow करणार आहे.

२.मासिक पाळी

मासिक पाळीविषयी तुमची कोणतीही समस्या असेल तर तुम्ही moringa powder चा वापर करू शकता.यामुळे पाळी अनियमित होणे.रक्तस्त्राव कमीजास्त होणे,यासारख्या समस्या दूर होणार आहे.

हेही वाचा :मासिक पाळी एका तासात येण्यासाठी १२ घरगुती असरदार उपाय

३.वजन कमी करणे

शेवगा जर नियमित आहारात घेतला तर आपले वजन कमी होते.काहीवेळा शरीरात रकतापेक्षा पाणी जास्त असते.त्यामुळे शरीर सुजते आणि वजन वाढल्यासारखे वाटते .जर शेवग्याची पानांची पावडर तुम्ही रोज सकाळी कोमट पाण्यातून घेतली तर वजन कमी होण्यास मदत होते.शेवगा लठ्ठपणा कमी करण्यासाठी तर उपयुक्त ठरतोच शिवाय त्यात लठ्ठपणाविरोधी (anti-obesity) गुणधर्म देखील आढळतात जे वजन वाढण्यास प्रतिबंध करतात.

४.मधुमेह/sugar

जर तुम्हाला sugar असेल तर तुमी शेवगा नियमित खावू शकता मधुमेहाच्या रुग्णांसाठी शेवगा अत्यंत उपयुक्त आहे. शेवग्या मधील अँटी-डायबेटिक (anti-diabetic) गुणधर्म मधुमेहाची पातळी कमी करण्यासाठी मदत करतात.

५.हाडे बळकट करण्यासाठी उपयोगी

हाडांची काळजी घेण्यासाठी तुम्ही शेवगा वापरू शकता. शेवग्यात फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम आढळतात जे हाडांसाठी महत्त्वाचे घटक मानले जातात.

६.ऍनिमियाची समस्या

शेवग्याने रक्तवाढ होतेच त्यासोबत रक्ताभिसरण होवून रक्तशुद्धी होते.एखाद्या व्यक्तीला अॅनिमियाची समस्या असेल म्हणजे रक्ताची कमतरता असेल तर शेवग्याच्या सेवनाने अॅनिमियाशी लढा दिला जाऊ शकतो.

७.स्मरणशक्ती सुधारते

शेवग्याचे सेवन केल्याने मेंदू निरोगी होऊ शकतो आणि स्मरणशक्ती देखील वाढू शकते, म्हणून जर तुम्हाला मेंदूशी संबंधित काही समस्या येत असतील तर असे करणे चांगले आहे.

८.प्रतिकारशक्ती वाढवते

कमकुवत प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी शेवगा खूप उपयुक्त आहे. याचे सेवन केल्याने एखादी व्यक्ती अनेक धोकादायक संसर्गापासून स्वतःचे संरक्षण करू शकते.

९.पुरुष किवा स्त्रियांमधील कमजोरी दूर करते

लग्नानंतर महिला किंवा पुरुषांच्या शरीरातील कोणतीही शारीरिक कमजोरी दूर करण्यासाठी शेवगा खूप उपयुक्त ठरू शकतो.पुरुषांमध्ये शुक्राणूंची कमतरता भरून काढण्यास शेवग्याचा फायदा होतो.

१०.वेदनाशामक

शेवग्याची साल व पानाचा रस पचण्यास जड व पीडाशामक असतो. शरीरावर सूज आल्यास आपण शेवग्याच्या सालीचा वापर करू शकतो.शरीर सुजले असेल तर शेवगा खाल्याने सूज कमी होते.

१२.अन्नपचन/पोट साफ करणे

शेवग्याच्या मुळाची साल तुरट, तीक्ष्ण, रुचकर, दीपक, पाचक, उत्तेजक व उदरवातनाशक, वातहरकस्वेदल, मूत्रल, कफहारक, सुजेवर गुणकारक व व्रणदोषनाशक असते. ती अतिदीपक असून अन्नपचनास मदत करणारी असते. शौचशुद्धी करणारी आहे. शेवगा वातनाड्या,
हृदय आणि मूत्राशयासाठी उत्तेजक आहे. त्यामुळे लघवीही भरपूर प्रमाणात होते.

१३.डोळ्यांसाठी –

शेवग्याचे बी डोळ्यांना हितावह आहे.शेवगा पावडरचा देखील तुम्ही उपयोग करू शकता.यामुळे डोळे निरोगी राहतात.आणि चष्म्याचा नंबर कमी होण्यास मदत होते.

१४.डोकेदुखी

विष, कफ आणि वायुनाशक आहे. त्याचे नस्य घेतल्याने डोकेदुखी थांबते.शेवग्याचे तेल देखील बाजारात उपलब्ध आहे.त्याच्या साह्याने तुम्ही नस्य करू शकता जेणेकरून तुमची डोकेदुखी कमी होईल.

१५.ताप

शेवग्याच्या सेवनाने घाम येऊन पुष्कळ लघवी होऊन ताप उतरतो.त्यामुळे तापामध्ये तुमी शेवगा खावू शकता.

१६.उचकी येणे/धाप लागणे

शेवग्याच्या पानांचा रस पाजल्याने उचकी थांबते व धाप कमी होते.

1७.पोटाचे विकार

शेवग्याच्या काढ्यात हिंग व सुंठ घालून पाजल्याने पोटफुगी दूर होते.पोटदुखी, अल्सर यांसारख्या पोटाच्या समस्या शेवग्याच्या सेवनाने दूर होतात.

१८.वायुगोळा

शेवग्याच्या पानाच्या रसात एक तोळा साखर घालून तीन दिवस पाजल्याने वायूचा
गोळा दूर होते.


१९.नळबंध

शेवग्याच्या सालीचा रस चार चमचे, दोन चमचे आल्याचा रस आणि अर्धा
तोळा मध एकत्र करून सात दिवस पाजल्याने नळबंध वायू दूर होतो

२०.जलोदर.

शेवग्याच्या सालीच्या काढ्यात, चित्रकमूळाचे चूर्ण, पिंपळीचे चूर्ण व सौंधव
घालून पाजल्याने जलोदर नाहीसा होतो.


२१.प्लीहोदर

शेवग्याच्या काढ्यात सैंधव, मिरे व पिंपळी घालून पाजल्याने प्लीहोदर दूर होतो.


२२.वातप्रकोप

वायुप्रकोपामुळे शरीरातील कोणत्याही भागात दुखत असल्यास शेवग्याचा काढा
करून पाजल्याने दुखायचे थांबते. या काढ्यात हिंग व सुंठ घातल्याने अधिक फायदा होतो.

२३.कृमी

शेवग्याच्या काढ्यात मध घालून दिवसातून दोनदा पाजल्याने बारीक कृमी
नष्ट होतात.

हेही वाचा : 20+Best Dry Skin Home Remedies|घरीच बनवा कोरड्या त्वचेला सुंदर आणि तजेलदार या घरगुती उपायांनी|


२४.मुतखडा

शेवग्याच्या मुळ्यांच्या काढ्यात सोडा घालून पाजल्याने मुतखडा बिरघळून निघून
जातो. शेवग्याच्या मुळ्यांचा काढादेखील मुतखड्यासाठी उपयुक्त आहे.

२५.गोठलेले रक्त

शेवग्याच्या सालीचा काढा करून पाजल्याने आणि त्याच्या सालीचे पोटीस
बांधल्याने साखळलेले रक्त मोकळे होते व गळवे बरे होतात किंवा लवकर पिकून
फुटतात.

२६.गळवे

शेवग्याची साल गळवांवर चोळल्यानेही गळवे जिरून जातात.

हेही वाचा : 20 Best Solution on All Hair Problems|केसांच्या समस्या आणि घरगुती उपचार

२७.नायटा

शेवग्याच्या मुळाची साल पाण्यात अथवा गोमूत्रात उगाळून नायट्यावर लेप
दिल्याने ते बरे होतात.


२८.केसांतील कोंडा

शेवग्याच्या पानांच्या रसाने डोक्याला मर्दन केल्याने डोक्यातील कोंडा बरा होतो.तसेच तुम्ही डोक्याला मेहंदी लावताना शेवगाच्या पावडरचा उपयोग करू शकता.यामुळे तुमचे केस निरोगी राहतील आणि केसांचे problem दूर होतील.

केस गळणे कारणे, केसांची घ्यायची काळजी आणि केस गळण्यावर घरगुती उपाय ;Hair Fall Remedies
केस गळणे कारणे, केसांची घ्यायची काळजी आणि केस गळण्यावर घरगुती उपाय ;Hair Fall Remedies

हेही वाचा : केस गळणे कारणे, केसांची घ्यायची काळजी आणि केस गळण्यावर ९ घरगुती उपाय


२९.मुळव्याध

मूळव्याध असणाऱ्या रोग्याला शेवग्याच्या काढ्यात बसवल्याने शुष्क मूळव्याधीत
होणाऱ्या वेदना दूर होतात.

30.नारू

शेवग्याच्या मुळांची हिरवी साल, चित्रकमूळ घेऊन वाटून नारूवर लेप केल्याने नारू बरा होतो.

31.चक्कर

शेवग्याच्या मुळांच्या स्वरसात रास्ना (एक वनस्पती) व मिरीचे चूर्ण घालून नस्य
दिल्याने सन्निपाताने आलेली बेहोषी दूर होते.

३२.मस्तकशूळ/डोकेदुखी

शेवग्याच्या पानांच्या रसात मिरे वाटून त्याचा लेप केल्याने मस्तकशूळ दूर होतो.
शेवग्याचा डिक दुधात वाटून मस्तकावर लेप दिल्याने मस्तकपीडा दूर होते.
शेवग्याचे बी आणि मिरीपूड एकत्र करून हुंगल्याने शिंका येऊन डोकेदुखी
दूर होते.

हेही वाचा : 10+ Powerful Home Remedies for Oily Skin|तेलकट त्वचेची अशी घ्या काळजी |वापरा घरगुती facepack

३३.दातदुखी

शेवग्याचा डिंक दाताच्या पोकळीत भरल्याने दातदुखी बरी होते.

३४.कान दुखणे

शेवग्याच्या मुळांच्या स्वरसात मध, तेल आणि सैंधव घालून त्याचे थेंब कानात
टाकल्याने कान दुखायचा थांबतो. तेलात शेवग्याच्या झाडाचा डिंक टाकून त्या तेलाचे काही थेंब कानात
टाकल्यानेही कानात दुखायचे थांबते.

हेही वाचा : Glowing Skin Secrets|चेहरा सुंदर आणि गोरा दिसण्यासाठी घरगुती उपाय facepack


३५.डोळे दुखणे

शेवग्याच्या पानांच्या स्वरसात सम प्रमाणात मध घालून तो डोळ्यात घातल्याने
डोळे दुखायचे थांबतात.


 ३६.रोगप्रतिकार शक्ती (Immunity)

जर एखाद्याची रोगप्रतिकार क्षमता कमी असेल तर रोगप्रतिकार शक्ती (Immunity वाढविण्यासाठीदेखील शेवगा उपयुक्त ठरतो.यासाठी तुम्ही शेवगा पावडरचा देखील उपयोग करू शकता.

FAQ

शेवगा पावडर कशी तयार करावी?

शेवग्याच्या फांद्यावरून पाने वेगळी करावीत. ती स्वच्छ धुऊन 
सावलीत वाळवावीत. उन्हामध्ये वाळवल्यास त्यातील जीवनसत्त्व अ नष्ट होते. वाळवलेल्या पानांची बारीक पावडर तयार करावी. ती हवाबंद बाटलीमध्ये साठवावी. ही पावडर प्रकाश आणि आर्द्रतेपासून दूर ठेवल्यास सहा महिन्यांपर्यंत चांगली टिकते. शेवगा उपलब्ध नसेल तर शेवगा पावडर विकतही उपलब्ध आहे.

दररोज शेवगा पावडर किती घ्यावी?

आपण दररोज ३ ग्रम शेवगा पावडर घेवू शकतो.

शेवगा पावडरचे sideeffect आहेका?

शेवग्याच्या सेवनामुळे रक्तदाब कमी होत असतो. ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी औषधे घेणार्‍या व्यक्तींसाठी मोरिंगाचे सेवन हानिकारक ठरू शकते. अशा लोकांनी याचे सेवन तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावे.

शेवगा पावडर आहारात कशी सामील करावी?

शेवग्याचे सांबर किंवा आपल्या भाषेत वरण करून खावे. खूपचा छान लागते.शेवग्याची ताजी पाने आणून त्यांचा ज्यूस करून पिता येईल.ही पाने कोशिंबीर किंवा सलाडमध्ये सुद्धा टाकुन आपण घेवू शकतो..मोरिंगा पावडर सलाडमध्ये, भाजीमध्ये किंवा कोमट पाण्यात सेवन करू शकता. ही पावडर तुम्हाला ऑनलाईन विकत मिळेल.किवा तुम्ही पावडर बनवून फ्रीज मध्ये ठेवून रोज सेवन करू शकता.. ही पाने स्वच्छ कपड्यावर हवेशीर खोलीत किंवा सावलीत वाळवावे लागतील. थेट सूर्यप्रकाशात वाळवू नये. ही पाने वाळायला तीन ते चार दिवस लागतात. वाळल्यानंतर ती मिक्सरमध्ये भुकटी करून हवाबंद डब्यात भरून ठेवावे

जलोदर काय आहे?

जलोदर म्हणजे उदरच्या लायनिंग आणि अवयवांमधील जागेमध्ये द्रव साचणे. हे
प्रामुख्याने लिव्हर सिर्होसिस (स्कारिंग) शी संबंधित आहे, ज्याचे कारण यकृताचा संसर्ग
किंवा यकृताचा लठ्ठपणा आणि मधुमेह असु शकते.

https://youtu.be/0HyL0-1VXMk

Leave a Reply

Your email address will not be published.

Share Article: